सोनिया गांधी यांची तब्येत बिघडली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना दिल्लीमधल्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती दुसऱ्यांदा बिघडल्याची माहिती मिळाली आहे. याआधी त्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली होती. आता प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्यांना उद्या हजर व्हायचं आहे. त्याआधी सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाली आहे. तर सोनिया गांधींना २३ जूनला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…