कनिष्ठ अभियंत्याच्या हलगर्जीपणाने अंधार पसरला ; सदैव दूरध्वनी नॉट रीचेबल ; मुख्य अभियंत्यांने कार्यवाही करावी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
तालुका स्थापन झाल्यानंतरही अनेक समस्या कायम आहेत. टाउनमध्ये सर्वाधिक विजेचा त्रास सुरू असून कनिष्ठ अभियंता यांच्या हलगर्जपणामुळे शहरात अंधार पसरला आहे. दर काही मिनिटाला विजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे स्थानिक नागरिक वैतागले आहेत.
कनिष्ठ अभियंता वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरचढ ठरल्याचे दिसून येत आहे.मुजोर झालेल्या कनिष्ठ अभियांत्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी समोर येवू लागली आहे.मान्सुनची हजेरी लावणार असल्याचा अंदाज दिसताच अतिशहाण्या टाउन अभियंत्याने विज बंद केल्याने सोशल मिडीयावर नव नियुक्त टाऊन अभियंत्या विरोधात चुटकुले सुरु झाले होते .
मान्सूनचे आगमन होताच पहिल्या पावसाने शहरातील विज वितरण कंपनीचा कारभार चव्हाट्यावर आला. सलग विजेच्या लपंडाव सुरू असल्याने विविध शासकीय कामे खोळंबली.याबाबत स्थानिकांनी टाऊन अभियंता यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल जाणूनबुजून कनिष्ठ अभियंता बंद ठेवत असल्याचे समोर आले आहे.
मागील अनेक दिवसापासून या कनिष्ठ अभियंत्यानें मोबाईल स्विच ऑफ करून नागरिकांना वेठीस धरत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांचे या टाऊन कनिष्ठ अभियंत्यावर दुर्लक्ष असल्याचे प्राथमिक मत स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
मुख्य अभियंता यांनी यावर लक्ष केंद्रित करून कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केल्या जात आहे.