कौशल्य विकास विभागातर्फे 12 ते 16 मे दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 10 मे :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांचे वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 12 ते 16 मे 2022 दरम्यान करण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर तसेच इतर ठिकाणी औद्योगिक संस्थांद्वारे मनुष्यबळाची मागणी करण्यात आल्यानुसार संबंधीत कंपन्यांशी संपर्क साधून एकूण 156 रिक्त पदांकरिता ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देवून सहभागी होता येईल. मेळाव्यात दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायीक अभ्यासक्रम पुर्ण केलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात.
रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभागी होण्यासाठी सेवायोजन कार्ड चा युझरनेम व पासवर्ड असणे आवश्यक आहे. नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in यावर नोंदणी करता येईल. नंतर जॉब फेअर टॅब मध्ये लॉग करून पं.दिनदयाल उपाध्याय जॉब फेयर यावर क्लिक करावे. येथे यवतमाळ जिल्हा निवडून 12 ते 16 मे दरम्यान रोजगार मेळावामध्ये नोंदणीकृत उद्योजकांनी अधिसूचित केलेल्या रिक्तपदांच्या पसंतीक्रमानुसार अप्लाय या टॅबवर क्लिक करून मेळाव्यात सहभागी व्हावे. अधिक माहितीकरिता 7020758701 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे यांनी कळविले आहे.