स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर शरद पवारांचं मोठं विधान ; एकत्र लढणार…? ; पवारांसमोर 2 ऑप्शन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोल्हापूर :- सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याबाबत सांगितलं. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवणार की वेगवेगळ्या लढवणार, हा मुद्दा चर्चेत आलाय.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी यावरुन मोठं विधान केलं. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होतं. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाब शरद पवारांनी स्पष्टपणे आपल्यासमोर असणारे दोन पर्यायच सांगून टाकले. मात्र अद्याप कोणत्याही निर्णय याबाबत झाला नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. या चर्चेत दोन मतप्रवाह समोर आल्याची माहिती शरद पवारांनी यावेळी दिली.
एकत्र लढणार?
लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकजुटीनं निवडणुकीला सामोरे जातात का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अशातच शरद पवारांनी केलेल्या विधानालाही महत्त्व प्राप्त झालंय.
शरद पवार यांना कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात याबाबत दोन मतप्रवाह असल्याचं म्हटलंय. काहींच्या मते प्रत्येकांनं आपआपल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यानंतर त्यावर एकत्रित यावं.
तर काहींना सरकारमध्ये एकत्र असल्यामुळे निवडणूकही एकत्र लढवावी, असं वाटत असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. सरकारमध्ये एकत्र असल्यानं एकत्र निवडणूक लढवली, तर ते सरकारसाठीही चांगलं राहिल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काहींनी नोंदवल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांची मतं आणि त्यांची विचारधारा काय आहे, हे आपल्याला माहीत नसल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे यावर थेट वक्तव्य करणं योग्य नाही असंही ते म्हणालेत. दरम्यान, एकमेकांची मतं कळल्यानंतर मी जाहीरपणे त्यावर बोलेन, असंही शरद पवारांनी यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…