पंजाब मधील आप आमदारांच्या ठिकाणावर सीबीआयचे छापे ; निवडणुकी जिंकल्यानंतर म्हणाले होते मी एक रुपया पगार घेईल , आता ४० कोटींच्या बँक अडकले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) आमदार जसवंत सिंह गज्जनमाजरा यांच्या जागेवर सीबीआयने छापा टाकला आहे. ४० कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे.
सुरुवातीच्या छाप्यात सीबीआयला स्वाक्षरी केलेले ९४ कोरे धनादेश मिळाले आहेत. अनेकांची आधार कार्डेही सापडली आहेत. १६.५७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी ८८ विदेशी चलनी नोटा, मालमत्तेची कागदपत्रे, अनेक बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या छापेमारी सुरू आहे.
गज्जनमाजरा हे अमरगड विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार आहेत. सीबीआयने गज्जनमाजऱ्याच्या सर्व ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. संगरूरच्या मालेरकोटला येथे ३ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. हा तोच आमदार आहे ज्याने निवडणूक जिंकल्यावर फक्त एक रुपये पगार घेणार असल्याचं शपथपत्र दिलं होतं.
आतापर्यंत ही वसुली
सुरुवातीच्या छाप्यात सीबीआयला स्वाक्षरी केलेले ९४ कोरे धनादेश मिळाले आहेत. अनेकांची आधार कार्डेही सापडली आहेत. १६.५७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी ८८ विदेशी चलनी नोटा, मालमत्तेची कागदपत्रे, अनेक बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. सध्या छापेमारी सुरू आहे. या प्रकरणी सीबीआयकडून अद्याप कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आलेली नाही.
२०११ ते १४ या कालावधीत कर्ज घेतले होते
आपचे आमदार जसवंत सिंह गज्जनमाजरा यांनी २०११ ते २०१४ दरम्यान बँकेकडून ४ हप्त्यांमध्ये कर्ज घेतले होते. हे कर्ज सुमारे ४०.९२ कोटी होते. बँकेच्या लुधियाना शाखेने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली. ज्यामध्ये गज्जनमाजरा यांनी ज्या उद्देशाने कर्ज घेतले होते त्याऐवजी अन्य ठिकाणी त्याचा वापर केल्याचे म्हटले होते.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….