लोकशाही दिनात 115 तक्रारी प्राप्त…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 2 मे, :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज एकूण 115 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या तक्रार अर्जावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज लोकशाही दिन प्रसंगी अधिकाऱ्यांना दिला.
प्रत्येक महिन्यातील पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, व विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.