राणा दामप्त्यास अटक ; आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. या दामप्त्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कलम १५३ (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय आणखी काही कलमं देखील लावण्यात आलेले आहेत. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अटक करण्यात आल्यानंतर आता आज किंवा उद्या न्यायालयात हजर करण्या अगोदर त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांनी मोठ्यासंख्यने गर्दी केली आहे.

याचबरोबर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात खार पोलिसांकडेच तक्रार नोंदवली असल्याचे देखील समोर आले आहे.

राज्यभरात मागील दोन दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर वातावरण चांगलचं तापलेलं होतं. शिवाय, राणा दाम्पत्य अमरावतीवरून मुंबईत देखील आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. आज सकाळपासूनच शिवसेना कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आणि नवनीत राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राणा दाम्पत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आम्ही मातोश्रीवर जाणार नसल्याचं सांगत, आपले आंदोलन रद्द केले. माध्यमांसमोर त्यांनी तशी घोषणा देखील दिली. यानंतर आता शिवसेनेकडून त्यांवर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपूरमध्ये पत्रकारपरिषद घेत राणा दाम्पत्य आणि भाजपावर जोरदार टीका केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….