कंबोज यांच्या पाठोपाठ किरीट सोमय्यांची गाडी शिवसैनिकांनी फोडली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 23 एप्रिल :- भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी जोरदार दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
तर सोमय्यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे.
यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे. सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती.
असा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याआधीही पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता 5 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत पोहोचले होते. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना अडवले. त्यावेळी सोमय्या आणि किरीट सोमय्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती.
सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली.
विशेष म्हणजे. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…