नवाब मलिकांना दणका ; “या” प्रकरणात दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण त्याच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुलांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यांनाही समन्स बजावलेला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सध्या नवाब मलिक हे अटकेत आहेत. त्यांनी आपल्या इतके विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. त्यावर उद्या ( 22 एप्रिल) रोजी सुनावणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्पूर्वी ईडीच्या वतीने मलिक यांच्या दोन्ही मुलांना ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली असून हजर राहण्याचा समन्सहि बजावण्यात आला आहे. तसेच ईडीकडून लवकरच मुलांविरोधात चार्जशिटही दाखल करण्याची शक्यता वर्तवली आहे.
या दरम्यान मलिक याचे अमीर मलिक व फराज मलिक यांना ईडीकडून समन्स देऊनही दोघांकडून ईडीच्या चौकशीसाठी गैरहजेरी लावण्यात आली आहे. तत्पूर्वी मलिक यांचा मुलगा फराज मलिक याला ईडीकडून तब्बल ३ वेळा तर अमीर मलिक याला 2 वेळा ईडीकडून नोटीस पाठवून समन्स बजावण्यात आलेला आहे. मात्र, तरीही ते ईडीच्या चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….