कोरोना काळात 5 नाही 40 लाख रुग्णांच्या मृत्यू , राहुल गांधीचा सरकार वर निष्काळजीपणाचा आरोप..…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- 2020 मध्ये भारतात कोरोनाचे (Corona in India) आगमन झाल्यापासून आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. सरकारी आकडेवारीनुसार, भारतात सूमारे पाच लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पण, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेल्या दाव्यानुसार, भारतात तब्बल 40 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी ट्विटरवरुन भाजप सरकारवर निशाणा साधला. त्यांनी दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे भारतात 40 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांनी सर्व मृतांच्या कुटुंबियांना 4-4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणीदेखली केली. राहुल गांधींनी आपल्या ट्विटसोबत न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “नरेंद्र मोदी स्वतः खरं बोलत नाहीत आणि इतरांनाही बोलू देत नाहीत. ते म्हणतात की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे देशात कोणाचाच मृत्यू झाला नाही. मी यापूर्वीही म्हटले होते की, कोरोनाच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा आणि प्रत्येक पीडित कुटुंबाला 4 लाख रुपयांची भरपाई द्या.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या घडामोडींना वेग, थेट गुप्त बैठक….
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..