हिंदूंनो तयार रहा 3 तारखेला…. :- राज ठाकरे पुन्हा आक्रमक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मशिदीवरचे भोंगे हा लोकांना वाटतं हा धार्मिक विषय मात्र हा सामाजिक विषय आहे. इथे एक मुस्लीम (Muslim) पत्रकार आहेत. ते स्वत: बाळा नांदगावकरांना भेटले आणि आपल्या लहान मुलाला अजानचा ( Azan ) त्रास होत असल्याचे सांगितले.
त्यामुळे याचा त्रास मुस्लिमांनाही होत आहे. आता रमजान (Ramzan) सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल.
दोन घोषणा
– महाराष्ट्र दिनी संभाजीनगरात एक मेला जाहीर सभा घेणार आहे
– पाच जूनला सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार
काय दिला इशारा?
या देशात, महाराष्ट्रात दंगली नको आहेत, हाणामारी नको आहे. या देशातील, महाराष्ट्रातील शांतता भंग करायची इच्छा नाही. पण माणुसकीच्या नात्याने मुस्लीम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, गरजेचे आहे. त्यांच्या प्रार्थनेला विरोध केलेला नाही. पण त्यांना लाऊडस्पीकरवरूनच ऐकायचे असेल तर आमच्याही आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरून ऐकाव्या लागतील. तीन तारखेपर्यंत वाट पाहू, नंतर जशास तसे उत्तर देऊ, असे ते म्हणाले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!