संजय बियाणी च्या हत्येतील “पल्सर” जाळली…? ; हत्येचं गुढ आणखी वाढलं…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कहाळा बु. परिसरात एका निर्जन ठिकाणी पल्सर कंपनीची दुचाकी जळालेल्या अवस्थेत आढळून आली.
शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बियाणींच्या हत्येमध्येही आरोपींनी पल्सर कंपनीच्या दुचाकीचा वापर केला होता. त्यामुळे ही दुचाकी त्याच गुन्ह्यातील आहे काय? अशी चर्चा या परिसरात सुरू होती. पोलिसांनी पंचनामा करून जळालेली दुचाकी ताब्यात घेतली.
कहाळा बु. परिसरातील मुंडकर शरफोद्दीन यांच्या शेतातील पडीक असलेल्या खड्ड्यामध्ये पल्सर दुचाकी जाळण्यात आली होती. मुंडकर शरफोद्दीन यांचा मुलगा शेतात गेला असता ही बाब त्याच्या लक्षात आली. याबाबत पोलिसांना माहिती दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..