संजय बियाणीच्या हत्येमागे रिंदाचा हात आहे का…? ; पोलिसांच्या अंतिम निष्कर्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येमागे कुख्यात गुंड रिंदा याचा हात नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत.
त्यामुळे आता वेगवेगळ्या दोन राज्यात बियाणी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पथकं पाठवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. सर्व सामान्य नागरिकांना बियाणींच्या हत्येबाबत कुठलीही खरी माहिती असेल, तर ती त्यांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नांदेडकरांना केलं आहे.
गहाळ मोबाईल पोलिसांच्या हाती
दरम्यान, संजय बियाणी यांचा गहाळ असलेला मोबाइल पोलिसांना सापडला आहे. त्यामुळे हत्येच्या दिवशी संजय बियाणी यांचा कुणाशी संवाद झाला होता, हे मोबाइलवरून उघड होईल. त्यातून हत्येचा सुगावा लागू शकेल, अशी आशा आहे. त्यामुळे या मोबाइलच्या माध्यमातून नेमकी काय माहिती उघड होतेय, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बियाणींच्या मारेकऱ्याला तत्काळ अटक करा, वेगाने तपास करा अशी मागणी करत अवघं नांदेड एकवटलं असून अद्याप या प्रकरणी महत्त्वाचा काहीही शोध लागलेला नाही. त्यामुळे हत्येचं गूढ कधी उकलतंय, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे बियाणी हत्या प्रकरण?
5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..