महाराष्ट्रात मनसेला मोठे खिंडार ; आणखी 35 मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षातील अनेक मुस्लिम नेते नाराज झाले आहेत. याआधी पुणे, मुंबई शहरातील अनेक नाराज मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत.
त्यानंतर आता मनसेला मराठवाड्यात मोठे खिंडार पडले आहे. मराठवाड्यातील 35 नाराज मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी दिली राजीनामा दिला आहे.
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. तेव्हापासून राज्यातील मनसेला गळती लागली आहे. दरम्यान आज मराठवाड्यातील 35 नाराज मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेला रामराम ठोकला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..