१०७ जणांवर गुन्हा दाखल ; वरिष्ठ पोलिस अधिकारी करणार चौकशी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवास स्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं. यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले.
या कर्मचाऱ्यांकडून बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली आहे. अचानक एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात 23 महिलांचाही सहभाग असल्याच समोर आलं आहे. दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज दुपारी अचानक राष्ट्र्रवादी नेते शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी 107 जणांसह 23 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावदेवी पोलिस ठाण्यात या १०७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दरम्यान, 107 जणांना अटक होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिलेत. या आदेशाचं आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला, किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….