मनसेवर नाराज वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंची खास ऑफर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं. राज ठाकरेंच्या गुडीपाडवा मेळाव्यातील भाषणाची चांगलीच चर्चा रंगलेली असताना मनसेचे पुणे शहर प्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोध दर्शवला होता.
राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोध करणं वसंत मोरेंना चांगलंच महागात पडलं. वसंत मोरे यांना पुणे शहर प्रमुख पदावरून हटवल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर मनसेवर नाराज वसंत मोरेंना शिवसेनेकडून (Shivsena) खास ऑफर देण्यात आली आहे.
वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी (NCP) प्रवेशाच्या चर्चा रंगल्या असताना युवा शिवसेना नेते वरूण देसाई (Varun Desai) यांनी मोरेंशी संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वसंत मोरेंना थेट ऑफर दिल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुखाच्या पदावरून काढून टाकल्यानंतर मनसे पुणे शहर प्रमुखपदी आता नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची वर्णी लागली आहे. तर वसंंत मोरे शिवसेनेची ऑपर स्वीकारणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..