शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग..? ; दोन माजी मंत्री , एक आमदार भाजपच्या संपर्कात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रत्नागिरी :- नाणार रिफायनरीवरून घेतलेला यू-टर्न शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रामुळे शिवसेनेत नाराजी आहे.
याच नाराजीचा फायदा घेण्यासाठी भाजपनं मेगाप्लान आखला आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे. या मिशनची जबाबदारी चार नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
नाणार रिफायनरीला शिवसेनेला विरोध होता. मात्र आता शिवसेनेची भूमिका बदलली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तसं पत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी भाजपनं व्यूहनीती आखली आहे. आशिष शेलार, प्रसाद लाड, नारायण राणे, निलेश राणेंकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नाणारसंदर्भातील भूमिका उद्धव ठाकरेंनी बदलल्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची कोंडी झाली आहे. ठाकरेंनी विश्वासात न घेतल्याची आणि पक्षात साईड लाईन केल्याची भावना शिवसेना नेत्यांमध्ये आहे. या नेत्यांशी भाजपनं संपर्क साधला आहे. शिवसेनेचे दोन माजी मंत्री आणि एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वृत्त सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मिशन कोकण हाती घेतलं आहे. शिवसेनेला नाराज नेत्यांना गळाला लावण्याची तयारी भाजपनं केली आहे. या नेत्यांसोबत चर्चेच्या दोन फेऱ्या यशस्वी झाल्याचं समजतं. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजप मिशन कोकण हाती घेईल. त्यानंतर योग्य वेळी शिवसेनेचे नाराज नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….