राज्याच्या राजकारणात येणार मोठे वादळ ; फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 06 एप्रिल :- महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. पण, आता हा वाद आता आणखी शिगेला पोहोचणार असे संकेत खुद्द भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
‘दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू’ असा निर्धारच फडणवीस यांनी केला आहे. भाजप पक्ष स्थापना दिननिमित्ताने मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
‘येत्या काळात मोठा संघर्ष उभा करावा लागणारं आहे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू. यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई ही थांबणार नाही.
हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित करतो’ असं म्हणत फडणवीस यांनी नव्या संघर्षाचे संकेत दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी जेव्हाही बोलतात तेव्हा आपल्याला ते दिशा दाखवतात. भाजपाची निर्मिती ही राष्ट्रवादातून झाली आहे. काश्मिरच्या मुद्यावरून मुखर्जी यांनी नेहरू मंत्री मंडळातून राजीनामा दिला होता.
भाजपा हा विश्वातील मोठा पक्ष म्हणून नाव समोर आलं आहे. भाजपा पक्ष संपवण्याकरीता खूप प्रयत्न करण्यात आले. अनेक नेत्यांना आणीबाणी काळात २-२ वर्ष जेल मध्ये ठेवण्यात आले. अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा २ होतो तेव्हा आम्ही घाबरलो नाही आणि आणि ३०० आहेत तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही’ असंही फडणवीस म्हणाले.
‘दोन संदेश मोदींनी आता दिले आहेत. एक समतेचा आणि दुसरा म्हणजे योजना प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचली पाहिजे’ असंही फडणवीस म्हणाले. ‘माझा शिवसेनेला सवाल आहे कि तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची कितवी टीम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून’ असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे भाजपची सी टीम असल्याची टीका केली होती, त्याला प्रत्युत्तर दिले.
आयएनएस विक्रांत किंवा असे अनेक आरोप किरीट सोमय्यांवर करण्यात आले होते. मात्र कोणत्याही आरोपाबाबत पुरावे देण्यात आले नाही. पोलिसांवर देखील खूप दबाव देण्यात आला मात्र पोलीस बोलेले अशी कारवाई करता येत नाही, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना टोला लगावला. दरम्यान, भाजपाचा स्थापना दिवस कार्यक्रम मुंबईत १२०० ठिकाणी सुरू आहे.
या देशासमोर खतरा निर्माण झालाय आणि तो खतरा घराणेशाहीचा निर्माण झाल्याच मोदींनी सांगितलं. मुंबईतील प्रत्येकाला घर हे फक्त घोषणेपुरते दिले नाही तर जे बोले ते दिले. घराणेशाहीने विश्वासघाताने डोकंवर काढलं आहे. मुंबई पालिकेत घराणेशाहीचा पराभव होणार आहे. ही काळ्या पाटीवरील पांढरी रेख आहे’ असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….