वार्षिक विवरणपत्र सादर न करणाऱ्या वृत्तपत्राची यादी जाहीर संबंधीत वृत्तपत्रानी उपविभागीय अधिकारी यांचेकडे लेखी स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 05 एप्रिल, :- दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, द्विपाक्षिक आदी विविध नियतकालिकांना कायद्यानुसार रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया (आरएनआय) यांच्याकडे रितसर नोंदणी करणे व टायटल पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच आर. एन. आय. कडे वार्षिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. वार्षिक विवरणपत्र सादर न करणाऱ्या वृत्तपत्रांची यादी उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयातील सूचना फलकावर जाहीर करण्यात आली असून यादीमध्ये नाव असल्यास संबंधीत मालक प्रकाशक यांनी वार्षिक विवरणपत्राबाबत आपले लेखी स्पष्टीकरण उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सादर करावयाचे आहे.
प्रेस अॅन्ड रजिस्ट्रेशन्स ऑफ बुक्स ऍक्ट 1867 नुसार विवरणपत्राची माहिती त्या-त्या वृत्तपत्रांतर्फे जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे रीतसर सादर न केल्याने ही कायदेशीर जबाबदारी संबंधित वृत्तपत्रांवर येते. वृत्तपत्राचे मालक, प्रकाशक यांनी दरवर्षी आपले वार्षिक विवरण विहित नमुन्यात दरवर्षी 31 मे पूर्वी आर.एन.आय.कडे ऑनलाईन सादर केली पाहिजेत. पीआरबी अॅक्ट 1867 नुसार हे स्पष्टही करण्यात आले आहे. असे असूनही यवतमाळ उपविभागातील तब्बल 159 वृत्तपत्रांनी ही कार्यवाही पूर्ण केल्याचे आढळून आले नाही.
आरएनआयच्या अभिलेख्याशी पडताळणी केली असता यवतमाळ येथून तब्बल 159 वृत्तपत्रांनी आपले विवरण सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याची यादी आरएनआयने पडताळणी व चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. त्यांनी दिलेल्या यादीतील वृत्तपत्रांनी गत पाच वर्षात आपले अंक प्रसिद्ध केले किंवा नाही याचीही चौकशी करण्याचे निर्देशीत केले आहेत. प्रतिज्ञापत्रात (फॉर्म 1) दिल्याप्रमाणे ज्यांनी आपल्या वृत्तपत्राचे अंक प्रकाशित केले नसतील त्या वृत्तपत्राची नोंदणी पीआरबी अॅक्ट 1867 नुसार रद्द करण्याचे प्रस्तावित केले आहे. चौकशीअंती यात कमतरता आढळल्यास त्यांची नावे कळविण्याबाबत आरएनआयचे अतिरिक्त प्रेस रजिस्ट्रार रिना सोनुवाल यांनी यवतमाळ जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना कळविले आहे. सदर वृत्तपत्रांच्या नावांची व प्रकाशक, मालक, मुद्रक यांची यादी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
यवतमाळ उपविभागातून प्रकाशित होणारे वृत्तपत्राचे प्रकाशक किंवा मालक यांनी सदर यादीत आपले नाव तपासुन यादीमध्ये नाव असल्यास वार्षिक विवरणपत्राबाबत आपले लेखी स्पष्टीकरण उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सादर करावे, असे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी कळविले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…