अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर 7 एप्रिल रोजी यवतमाळमध्ये….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 05 एप्रिल, :- महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष तथा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर हे 7 एप्रिल 2022 रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासमवेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सचिव शशांक बर्वे, सदस्य आर.डी. शिंदे, सदस्य के.आर.मेंढे व आयोगाचे जनसंपर्क अधिकारी रमेश शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन. सकाळी 11 ते 1 जिल्हा परिषद सभागृह येथे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख यांचे सोबत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची आढावा बैठक. दुपारी 1 ते 2.15 प्रधानमंत्री यांचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा. दुपारी 2.30 वाजता यवतमाळ येथून चंद्रपूरकडे प्रयाण.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…