वंचित बहुजन आघाडी आक्रमक ; तर गुन्हा दाखल करून राज ठाकरेंना बेड्या ठोका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला देखील डिवचले.
तसेच मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला हात घालत मनसैनिकांना हनुमान चालीसाचे स्पीकर लावण्याचं आवाहन केलं. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. तर यातच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी राज यांचे भाषण पोलिसांनी गांभीर्याने घेण्याचं सूचवलं आहे.
रेखा ठाकूर यांनी मागणी केली आहे की,’महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत. त्या ठिकाणी जाऊन कसुन चौकशी करावी त्या पुढे म्हणाल्या, काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद व मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी.’
परंतु ही चौकशी होत असतांना जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांनी बेड्या ठोका.’अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….