विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची साडेतीन तास चौकशी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात सोमवारी साडेतीन तास चौकशी करत पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला.
आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबई बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा दरेकर यांच्यावर आरोप आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारास दरेकर चौकशीसाठी आले. त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणी केली आहे. तसेच मजूर असल्याचे पुरावेदेखील मागण्यात आल्याचे समजते.
चौकशीत पोलिसांनी तेच तेच प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. अनेक नियमबाह्य प्रश्नही विचारले गेले. स्वत: पोलीस आयुक्तच चौकशीवर नजर ठेवून असल्याने, अधिकाऱ्यांवर राज्य सरकारचा दबाव होता, हे स्पष्ट जाणवत होते. पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे.
– प्रवीण दरेकर,
विरोधी पक्षनेते, विधान परिषद

‘HSRP’नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास…
महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलच्या दरात 3.14 रुपयांनी वाढ..?
पवार कुटुंबात मोठी फूट…! रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार,अजितदादांच्या जवळच्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ….
सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..