“आमदारांना घर देवू नयेत” ; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक घोषणा केल्या आहेत. आमदारांना घरे देण्याच्या घोषणेनंतर राज्य सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता ठाकरेंच्या घोषणेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरे देण्यात येवू नयेत, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पवार म्हणाले आहेत.
गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून आमदारांना घरे द्या. या निर्णयाबाबत आपण मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधकांच्या टीकेला आपण किंमत देत नाही, असंही पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, आमदार निवासाची व्यवस्था असताना मुंबईत आमदारांना घरे देण्यामागचं प्रयोजन काय आहे, असा सवाल नागरिक सरकारला विचारत आहेत

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…