नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारचा “हा” मोठा निर्णय……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
परिणामी आता मलिक यांच्याबाबत ठाकरे सरकारनं (Thakeray Government) मोठा निर्णय घेतला आहे.
नवाब मलिक यांच्याकडं अल्पसंख्यांक मंत्री आणि कौशल्य, उद्योजकता, रोजगार या खात्यांचा कारभार होता. राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंनी आता या खात्यांचा कारभार अन्य मंत्र्यांना सोपवला आहे. राजेश टोपे (Rajesh Tope) कौशल्य विकास खातं तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अल्पसंख्यांक खातं सांभाळणार आहेत.
नवाब मलिक यांच्याकडं असणाऱ्या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील काढून घेण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या मोठ्या विरोधानंतरही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला गेला नाही. राज्यातील जनतेचं काम अडकू नये म्हणून इतर मंत्र्यांकडं कारभार सोपवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….