पटोलेंना मोदी बद्दलचं वादग्रस्त वक्तव्य भोवणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून काही दिवसांपूर्वी एक मोठा वाद उभा राहिला होता.
पटोले यांनी ‘मोदी’ हे नाव संबोधून केलेल्या काही आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच असल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याचवेळी मुंबई भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर त्यांना मिळालेल्या उत्तराच्या पत्राला आज लोढा यांनी आपल्या ट्विटवरून शेअर केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत लोढा यांनी ही मागणी केली होती. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयाने उत्तर दिलं आहे. तुमचं पत्र आम्हाला मिळालं असून, योग्य ती कारवाई करण्यासाठी ही माहिती पोलिसांकडे देण्यात आल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आता नाना पटोलेंची चौकशी होणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांनी आपण हे वक्तव्य गावातील एका गुंडासाठी केलं असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार पुढे भंडारा जिल्ह्याच्या गोंदी या गावातील हा गावगुंड मोदी दारू विकतो, पितो आणि त्यातूनच त्यानं नाना पटोले यांच्या विरोधात अपशब्द बोलले आणि त्यांच्या विरोधात प्रचार केला, असा दावा ऍड. सतीश उके यांनी केला होता. मुळात या मोदीचं मुळं नाव उमेश घरडे उर्फ मोदी असं आहे असंही सांगण्यात आलं होतं. अनेक लोकं त्याच्या मागे लागले त्यामुळं तो घाबरून आपल्याकडे आला आणि आपण त्याला माध्यमांसमोर आणल्याचं उके यांनी सांगितलं होतं.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…