वाढत्या मंहगाईमुळे कॉंग्रेसच्या केंद्र सरकारवर हल्लाबोल , म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गरीब कल्याण योजनेला 6 महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
यावरून काॅंग्रेस (Congress) प्रवक्त्या अलका लांबा यांनी महगाईवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.
90 रूपये लीटरचं पेट्रोल (Petrol) टाका, 1000 रूपयांचा गॅस (Gas Cylinder) ठेवा, 200 रूपये किलोचं तेल घ्या, त्यानंतर घरी जाऊन फ्रीमध्ये मिळालेल्या राशनचा स्वयंपाक बनवा आणि जेवण करा. हे करण्याची मजा वेगळीच आहे, अशी खोचक टीका लांबा यांनी केली आहे.
अलका लांब यांनी सातत्यानं केंद्र सरकारविरोधात सोशल मीडियाच्या माध्यामातून टीका केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून सातत्यानं पेट्रोल आणि डिेझेलच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. परिणामी केंद्र सरकारला टीकेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं गरीब कल्याण योजनेची मुदत वाढवली असली तरी वाढत्या महागाईनं नागरिकांना त्रास जाणवत आहे. काॅंग्रेसनं देशभरात वाढत्या महागाईवरून भाजपविरोधात आंदोलन करण्याची रणनिती आखली आहे

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….