शिवसेनेचा मोठा नेता आयकर विभागाच्या रडारवर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 17 मार्च :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. अशातच 8 मार्च रोजी आयकर विभागाने राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले होते.
मुंबईसह राज्यभर 26 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये राज्यातील शिवसेनेचा एक मोठा नेता आयकरच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. युवा सेना पदाधिकारी राहुल कनाल, आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेना पदाधिकारी आणि केबल व्यावसायिक सदानंद कदम आणि एका सीएवर आयकर विभागाने धाड टाकली होती. मुंबई पुणे सांगली, रत्नागिरीत येथे छापे टाकले होते.
दापोली येथे एका मोठ्या राजकीय नेत्याने २०१७ साली मोठी जमीन खरेदी केली होती. १ कोटीच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती. या १ कोटी १० रुपयांची व्यवहाराची नोंद २०१९ मध्ये करण्यात आली. २०१७ ते २०२० या दरम्यान या जमिनीवर मोठे आलीशान रिसॉर्ट बनवले गेले.
या नंतर ही जमीन अधिकृतरित्या त्या राजकीय नेत्याच्या नावे झाली. पण रिसॉर्ट पुर्ण झाल्यावर ही संपत्ती मुंबईतील एका केबल व्यावसायिकाला विकण्यात आली. पण फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेली. या रिसॉर्टवर ६ कोटी खर्च करण्यात आले होते.
एका सरकारी अधिकाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यातही मोठी माहिती समोर आली. (नागपूर जळीतकांड प्रकरणाला नवे वळण, निकीतानेच मागवले होते मित्राकडून डिझेल!) या सरकारी अधिकाऱ्याने पुण्यात एक बंगला, एक फार्म हाऊस, तासगाव येथे मोठे फार्म हाऊस, सांगलीमध्ये २ बंगले, तनिष्क व कॅरेट नावाचे हिऱ्यांच्या दागिन्यांचे शोरुम, व्यावसायिक गाळे, पुण्यात ५ फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, नवी मुंबईत जमीन, सांगली बारामती पुणे येथे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती अशी माया गोळा केली. एवढंच नाहीतर बांधकाम व्यावसाय आणि पाईप निर्मितीचा व्यवसाय सुद्धा सुरू केलाा. या व्यवसायात राज्य सरकार मार्फत काही सवलत ही दिली गेली आहे.
बनावट व्यवहार आणि बनावट कागदपत्रांच्या साह्याने जवळपास 27 कोटी रुपयांचा अपहार केला गेला आहे. (अंतराळावर नेमकं कोणाचं वर्चस्व? रशिया-युक्रेन युद्धामुळे अख्ख्या जगावर संकट?) बारामती येथे 2 कोटी रुपये रोख देवून जमिनीचा व्यवहार करण्यात आला. ज्यात कर बुडवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. छाप्या दरम्यान ६६ लाख रुपये रोख, इलेक्ट्रॉनिक पुरावे, डिजिटल डेटा जप्त करण्यात आला असून ते फॉरेंसिक चाचणीकरता पाठवण्यात आला आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….