पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या भ्रष्टाचारविरोधात मोठा निर्णय ; भगतसिंग यांच्या शहीद दिनानिमित्त जाहीर करणार हेल्पलाईन नंबर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंडीगढ़ :- पंजाबचे नवे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात भ्रष्टाचार मोठी मोहिम सुरू केली असून त्यांनी राज्यातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी आज मोठा निर्णय घेतला आहे. मान यांनी भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी राज्यात भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन क्रमांक जारी केला जाईल, अशी घोषणा आज केली.
या हेल्पलाईनच्या माध्यमातून पंजाबमधील लोक व्हॉट्सअॅपवर भ्रष्टाचारासंबंधीच्या तक्रारी पाठवू शकतील असे सांगितले आहे.
राज्यातील जनता आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करू शकणार आहे. इतकेच नाही तर हा नंबर खुद्द पंजाबचे मुख्यमंत्री भगवत मान यांचा पर्सनल व्हॉट्सअॅप नंबर असणार आहे, याबद्दलची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. हा हेल्पलाईन नंबर 23 मार्च रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे भगवंत मान यांनी सांगितले. ९९% लोक प्रामाणिक आहेत, १% लोक व्यवस्थेचा नाश करतात. मी नेहमीच प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले. आता पंजाबमध्ये हफ्ते वसुली थांबणार आहे. हफ्ते वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास देणार नाही.
मान यांनी ट्विट केले आहे की, “भगतसिंहजी यांच्या हुतात्मा दिनी अँटी करप्शन हेल्पलाईन नंबर जाहीर केला जाईल, तो नंबर माझा पर्सनल व्हॉट्सअॅप नंबर असेल. जर तुम्हाला कोणी लाच मागत असेल, तर त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करुन मला पाठवा. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पंजाबमध्ये आता भ्रष्टाचार चालणार नाही.”

या घोषणेपूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कू या सोशल मिडिया अॅप्पवर एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी “पंजाबच्या हिताच्या दृष्टीने आज एक खूप मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पंजाबच्या आजपर्यंतच्या इतिहासात कुणीही अशा प्रकारचा निर्णय घेतला नसेल. मी त्या निर्णयाची घोषणा लवकरच करेन”. दरम्यान नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या त्यामध्ये पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पंजाब विधानसभेतील ११७ जागांपैकी तब्बल ९२ जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
३ मे रोजी झालेली NEET 2026 परीक्षा अखेर रद्द, आता ‘या’ दिवशी होणार पुन्हा पेपर..?
सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..