कोरोनाचा पुन्हा कहर बरसणार…? ; चीन नंतर “या” देशातही लाट…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कोरोनाने जगात चांगलाच हाहाकार माजवला होता. पहिल्या दोन लाटेत अनेक देशांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. यानंतर कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन घेऊन आली. आता चौथी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे.
अशात चीनमध्ये कोरोनाने पुन्हा तोंडवर केले आहे. यामुळे येथे लॉकडाऊनही लावण्यात आले आहे. दुसरीकडे बुधवारी (ता. १६) दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्गाची ४,००,००० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली.
दक्षिण कोरियाच्या माध्यमांनुसार, देशात दररोज ४,००,७४१ नवीन कोरोना (coronavirus) रुग्णांची नोंद केली जात आहे. जी मागच्या वर्षी जानेवारीमध्ये देशात कोरोना रुग्णांची नोंद झाल्यापासून सर्वाधिक आहे. यापैकी बहुतेक स्थानिक संसर्गाची प्रकरणे सांगितले जात आहे. म्हणजेच देशात कोरोनाचे स्थानिक संक्रमण सुरू झाले आहे. दक्षिण कोरियात (South Korea) आता एकूण रुग्णसंख्या ७,६२९,२७५ वर पोहोचली आहे.
दक्षिण कोरियासाठी (South Korea) मंगळवार सर्वांत प्राणघातक दिवस होता. २४ तासांत २९३ जणांचा मृत्यू झाल्याचे कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने बुधवारी सांगितले. कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबमधील सुमारे १७.५ दशलक्ष रहिवाशांना लॉकडाऊनमध्ये (lockdown) ठेवले आहे. याशिवाय शांघाय आणि इतर शहरांवरही निर्बंध लादले (lockdown) आहेत.
दुसरीकडे चीनला कोरोनाच्या (coronavirus) सर्वांत वाईट उद्रेकाचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये बुधवारी ३,२९० नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली गेली. ज्यात ११ गंभीर प्रकरणांचा समावेश आहे. चीनमध्ये २०१९ च्या उत्तरार्धात वुहानमध्ये प्रथम विषाणूचा संसर्ग झाला होता. तेथे एका वर्षाहून अधिक काळ अधिकृतपणे कोविड संबंधित मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी बातमी वृत्तसंस्थेने दिली आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….