पंजाबचे मुख्यमंत्री “मान” यांची पहिली प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हरियाणा :- भगवंत मान यांनी पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांनी शहीद भगतसिंग यांच्या खटकर कलान गावात मान यांना शपथ दिली.
यावेळी मान यांनी महत्वाचं वक्तव्य केलं. आपल्या राजकीय विरोधकांची खिल्ली उडवणार नाही. मला आऱोप-प्रत्यारोपांचं हिन दर्जाचं राजकारण करायचं नाही, असं भगवंत मान (Bhagwatn Mann) म्हणाले.
मला ज्यांनी मत दिले नाही त्यांचाही मी मुख्यमंत्री आहे. हे त्यांचे सरकार असून आम्ही त्यांच्यासाठीही काम करू. ही लोकशाही आहे. त्यामुळे इथं प्रत्येकाला स्वतःच्या राजकीय विचारधारेनुसार चालण्याचा अधिकार आहे. मी खूप अहंकारी आहे, असं लोकांनी समजू नये, असंही भगवंत मान म्हणाले.
भगतसिंग यांना स्वातंत्र्यानंतरच्या भारताची काळजी वाटत होती. आता आम आदमी पक्ष पंजाबमध्ये राहून आपली बेरोजगारीपासून तर शेतीपर्यंत प्रगती करणार आहे. लहान मोठ्या समस्यांवर उपाय शोधू. पंजाबमध्ये शाळा आणि रुग्णालये बांधू, असे आश्वासन भगवतं मान यांनी दिले. तसेच या कामांसाठी जनतेचा आशीर्वाद देखील त्यांनी मागितला. यापूर्वीचे कार्यक्रम राजवाडे आणि स्टेडियममध्ये झाले. पण, आम्ही शहीद भगतसिंग यांच्या गावात शपथ घेतली. शहिदांचे फक्त विशिष्ट दिवशी स्मरण न करता दररोज स्मरण करूया, असंही ते म्हणाले. तसेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करत त्यांनी राष्ट्रीय राजकारण परिवर्तन घडवून आणल्याचं मान म्हणाले.
नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने जोरदार विजय मिळविला. काँग्रेससारख्या प्रस्थापित पक्षाला मागे टाकत ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या. मान यांनी धुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांचा ५८,२०६ मतांनी पराभव केला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..