“आप” च्या शपथविधीला दोन कोटीचा खर्च येणार ; जय्यत तयारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चंडीगड :- पंजामध्ये तब्बल ९२ जागा मिळवत ‘आप’ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यानंतर आता पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून आप नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान हे शपथ घेणार आहेत.
शनिवारी त्यांनी पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची राजभवनात भेट घेऊन ९२ नवनिर्वाचित आमदारांचे समर्थन पत्र सादर केरत सत्ता स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी त्याला मंजूरी दिली. त्यानंतर आता 16 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजता शहीद-ए-आझम भगतसिंग यांचं मूळ गाव खटकर कलान येथे त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जोरदार तयारी केली आहे.
पंजाबमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे या ऐतिहासक शपथविधी सोहळ्यासाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी केली आहे. सोहळ्यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. मान यांनी अनेक दिग्गज्जांना निमंत्रण दिलं असून, या कार्यक्रमासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शपथविधीदरम्यान विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी विशेष चौक्या लावण्यात आल्या आहेत. यासोबतच सीआयडी आणि इतर गुप्तचर यंत्रणांची देखील या सोहळ्यावर पूर्ण नजर असणार आहे. भगवंत मान यांनी याआधीच पंजाबच्या जनतेला शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…