हिजाबच्या निर्णयावरून विद्यार्थ्यांच्या परीक्षा वर बहिष्कार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कर्नाटक : हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे.
यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निकालाला विरोध करत कर्नाटकमध्ये मुलांनी परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी सांगितले की ते निकालाबाबत पालकांशी चर्चा करतील आणि त्यानंतर हिजाब न घालता वर्गात हजर राहायचे की नाही हे ठरवतील.”आम्ही आमची परीक्षा हिजाब घालूनच देऊ. जर त्यांनी आम्हाला हिजाब काढण्यास सांगितले तर आम्ही परीक्षा देणार नाही,” असे एका विद्यार्थ्याने सांगितले.
कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब प्रकरणावर निकाल दिल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर, कर्नाटकातील यादगीर येथील सुरापुरा तालुका केंबवी सरकारी पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि तेथून निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात पूर्वतयारी सुरू होती आणि निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. सकाळी १० वाजता सुरू झालेली परीक्षा दुपारी १ वाजेपर्यंत संपणार होता. महाविद्यालयाच्या प्राचार्या, शकुंतला यांनी सांगितले की, त्यांनी विद्यार्थ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले. “पण त्यांनी नकार दिला आणि परीक्षा हॉलमधून बाहेर पडले. एकूण ३५ विद्यार्थी कॉलेजमधून बाहेर पडले,” अशी माहिती त्यांनी दिली.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….