विरोधकांना धक्का ; विधान सभेत 5 आमदारांना निलंबित केलं अन् थेट उचलून सभागृहाबाहेर काढलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- विधानसभेच्या अधिवेशनात (Assembly Session) आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांत जोरदार खडाजंगी झाली.
विषारी दारू पिऊन झालेल्या मृत्यूंप्रकरणी तेलगू देसम पक्षाच्या (TDP) सदस्यांनी विधिमंडळात आवाज उठवला. त्यांनी या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरवात केली. यामुळे विधानसभा अध्यक्षांनी अखेर टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले. या आमदारांना अखेर मार्शलनी उचलून सभागृहाबाहेर काढले. यावरुन आता सत्ताधारी वायएसआर काँग्रेस (YSR Congress) विरुद्ध टीडीपी अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.

आंध्र प्रदेशच्या (Andra Pradesh) विधिमंडळात आज चर्चा सुरू असताना टीडीपीच्या सदस्यांनी कामकाजात गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा रोखून धरली. जगनारेड्डीगुडेम येथे विषारी ताडी पिऊन झालेल्या मृत्यूंची चर्चा करण्याचा मागणी त्यांनी लावून धरली. यावर आरोग्यमंत्री अल्ला काली कृष्णा श्रीनिवास यांनी निवेदन देण्याची तयारी दर्शवली. यावरही टीडीपीच्या आमदारांनी गोंधळ कायम ठेवला. त्यांनी अध्यक्ष तम्मिनेनी सीताराम यांच्यासमोर धाव घेतली. त्यांनी अर्थसंकल्पाची कागदपत्रे फाड़ून सभागृहात भिरकावली.
यानंतर सभागृहातील परिस्थिती गंभीर बनली. अखेर विधानसभा अध्यक्षांनी टीडीपीच्या पाच आमदारांना निलंबित केले. यात के. अचननायडू, जी.बुचय्या चौधरी, पाय्यवुला केशव, एन. रामा नायडू आणि डी.बाला वीरांजनेय स्वामी या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांचे निलंबन अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत कायम राहणार आहे. त्यांना अधिवेशन संपेपर्यंत विधिमंडळात प्रवेश करता येणार नाही. निलंबनानंतरही टीडीपीच्या आमदारांनी सभागृहातून बाहेर जाण्यास नकार दिला. जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर आधी चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. ते विधानसभा अध्यक्षांच्या पोडिमयवरही चढले. अखेर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना पाचारण केले. मार्शनली या आमदाराला उचलून सभागृहाबाहेर काढले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..