गुंजच्या सर्व सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गुंज :- सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रोहिणी चवरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
तिच्या यशामुळे महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महागाव तालुक्यातील गुंज येथील वडिलोपार्जित शेती व्यवसाय करणारे मधुकर चवरे यांची कन्या रोहिणी हिने पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. तिने २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पीएसआय पूर्व आणि मुख्य परीक्षा दिली. ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. मात्र, कोरोनामुळे मौखिक व शारीरिक चाचणी होऊ न शकल्याने तब्बल तीन वर्षांनंतर २०२२ मध्ये पार पडलेल्या मौखिक व शारीरिक चाचणी परीक्षेत उत्तीर्ण होत तिने ओबीसी महिलांमधून राज्यातून १४ वा क्रमांक पटकाविला. तिची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड करण्यात आली आहे.
रोहिणीला बालपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड होती. आई, वडिलांनी तिला अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच तिने यशाला गवसणी घातली आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय वडील मधुकर चवरे, आई सोनूताई, भाऊ अजय, नातेवाईक तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गिते, ताई जोशी, भाऊ जनगावे, सोळंखे (आयपीएस), उपनिरीक्षक तथा नायब तहसीलदार उत्तम पवार, इद्रीस पठाण, एसआरपीएफ मधील जोशी यांना दिले. तिच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. गुंजसारख्या खेडे गावातून महिला पोलीस निरीक्षक होऊन रोहिणी चवरे हिने महागाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….