संजय राऊत यांनी एकांतात बड़बड़ करण्याची सवय लावली :- राज ठाकरे यांची राऊतांवर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता एकांतात बडबड करण्याची सवय लावावी अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसे चे एकमेव आमदार राजु पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर देत वरील उद्गार काढले.
राऊतांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावून घ्यावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणुन मनसे आमदार राजु पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.
मनसे आमदार राजु पाटील यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला असुन दिवसेंदिवस दिवावासियांचा मनसेकडे ओढा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सहज संपर्क साधता यावा यासाठी दिवा पूर्व येथील दिवा-शीळ रोडवरील चंद्रांगण रेसिडेन्सीमध्ये आ.राजु पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी सायंकाळी पार पडला.
याप्रसंगी,मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, मनसे महिलाध्यक्षा समिशा मार्कंडे आदींसह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….