राज्याच्या आज अर्थसंकल्प ; अर्थसंकल्पात केली “या” घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
कोरोनाचा जोर ओसरल्यानंतरचा हा अर्थसंकल्प असल्याने मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. मागील दोन अर्थसंकल्पावर कोरोनाचे सावट होते. कोरोनाचा मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून कोणती घोषणा करणार याकडे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही प्रमुख घोषणा :
आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देणार, त्यापैकी 800 कोटी रुपये यावर्षी.
कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150 रूग्णालयांमध्ये सुविधा.
सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार.
सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी 29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1 हजार 941 कोटी 64 लाख रुपये तरतूद.
> कृषी विकास
3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित.
शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल.
प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार.
शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान.
> जलसंपदा
जलसंपदा विभागास 12 हजार 951 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित.
> मदत व पुनर्वसन
मदत व पुनर्वसन विभागास 11 हजार 454 कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित
> रस्ते विकास
नांदेड ते जालना या 200 किलोमीटर लांबीचे 7 हजार कोटी रूपये अंदाजित रकमेचे द्रुतगती जोड महामार्गाचे नवीन काम.
पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रूपये अंदाजित किंमत.
> मुंबईच्या विकासाचे प्रकल्प
– सप्टेंबर 2022 मध्ये शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे नियोजन. वरळी ते शिवडी उड्डाणपूलाचे काम सुरु, 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन.
– 40 हजार कोटी रुपये किंमतीच्या 126 किमी लांबीच्या विरार ते अलिबाग ‘मल्टिमोडल कॉरिडॉर’ भूसंपादनाचे काम सुरू
– 15 किलोमीटर लांबीचा ‘ठाणे कोस्टल रोड’ बांधणार, जवळपास 1 हजार 250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
– गोरेगाव-मुलुंड लिंकरोड, किंमत 6 हजार 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित, निविदाविषयक कार्यवाही सुरू
> महिला व बालविकास
– राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजने अंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत.
– ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना, शासनाकडून राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस उपलब्ध करून देणार.
> सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
– मोठ्या शहरातील महिलांना प्रवासासाठी ‘तेजस्विनी योजनेत’ आणखी विशेष महिला बस उपलब्ध करून देणार
– राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करणार
> सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
– अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इयत्ता 6 वीपासून सी. बी. एस. ई. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार.
– दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल असे वेब अॅप्लिकेशन तयार करण्यात येणार
– तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना सुरू करण्यात येणार

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..