लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विकास योजनांची माहिती जिल्ह्यात कलापथकांचे कार्यक्रम सुरू.….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 09 मार्च, :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात राबविलेल्या विकास कामांची आणि योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये विषेशत: महत्वाच्या आठवडी बाजार भरणाऱ्या गावात कलापथकांचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या अंतर्गत आज ९ मार्च रोजी पाटणबोरी (ता. केळापूर), मोहा (ता. यवतमाळ) व खापरी (ता घाटंजी) येथे कलापथकाद्वारे कार्यक्रम घेण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामुख्याने आधुनिक माध्यमांसोबतच पारंपरिक माध्यमांचाही वापर केला जातो. यात लोककला हे एक प्रभावी माध्यम असून मनोरंजनातून शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवता येते. याच अनुशंगाने यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलापथकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कलापथकाचे कार्यक्रम यवतमाळ तालुक्यातील मोहा, तिवसा, रुई, अकोला बाजार, केळापूर तालुक्यातील पाटणबोरी, उमरी रोड, पाहापळ, रुझा, कळंब तालुक्यातील जोड मोहा, नांझा, डोंगर खर्डा, कोठा, बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव देवी, सावर, घारफळ, गणोरी दारव्हा तालुक्यातील बोदगाव, लोही, बोरी खु., भांडेगाव, महागाव, नेर तालुक्यातील मांगला देवी, सोनवाढोणा, धनज, आर्णी तालुक्यातील जवळा, परसोडा, ईचोरा, सावळी, महागाव तालुक्यातील फुलसावंगी, गुंज, पोखरी, हिवरा, उमरखेड तालुक्यातील मुळावा, ब्राम्हणगाव, पोफळी, तरोडा, पुसद तालुक्यातील रोहडा, गोळ खु., ईसापूर, बेलोरा, दिग्रस तालुक्यातील कलगाव, आरंभी, वारंदळी, झरी तालुक्यातील शिबला, माथार्जुन, पाटण, मुकुटबन, वणी तालुक्यातील घोन्सा, सुर्ला, राजुर, पुनवट, कायर, मारेगाव तालुक्यातील कुंभा, मार्डी, टाकळखेडा, नवरगाव, राळेगाव तालुक्यातील किन्ही जवादे, दहेगाव, वडकी, खैरी, घाटंजी तालुक्यातील खापरी, मानोली, कुर्ला या गावांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….