उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पराभवाची चिन्ह दिसू लागल्यानंतर प्रियंका गांधीचं विधान ; म्हणाल्या “आपली लढाई आता”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होण्याआधी काँग्रेसचे महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे.
नव्या ऊर्जने आपल्याला पुढील वाटचाल करायची असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर प्रियंका गांधी यांनी हा संदेश दिला. उत्तर प्रदेशसहित मणिपूर, उत्तराखंड आणि कदाचित गोव्यातही भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडे सत्ता जाण्याची चिन्हं आहेत.
“राज्यात दीर्घकाळ काँग्रेसचे सरकार नसतानाही तुम्ही ज्याप्रकारे जनतेसाठी लढलात आणि राजकारणाचा खरा उद्देश असलेल्या जनसेवेसाठी कटिबद्ध राहिलात, याचा मला खूप अभिमान,” असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधी यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडल्या आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रभारी राहिलेल्या प्रियंका गांधी यांनी हा जनतेने दिलेला निकाल असून आपण आणि आपला पक्ष त्याचा आदर करेल असं सांगितलं आहे.
“जनादेशाचा आदर करत देश व राज्याप्रती निष्ठा व समर्पण भावनेने लढा सुरू ठेवण्याची तयारी आपल्याला करावी लागेल. आपला लढा नुकताच सुरू झाला आहे. आपल्याला धैर्याने आणि नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. सोमवारी प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्षाने जितका देता येईल तितक्या जोमाने लढा दिला असून निकालाची वाट पाहू असं म्हटलं होतं.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भाजपच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी घट होईल, मात्र ४०३ सदस्यांच्या विधानसभेत जवळपास २४० जागांसह हा पक्ष बहुमत मिळवेल, असा अंदाज आहे. समाजवादी पक्षाने सत्ताधारी भाजपाला जोरदार लढत दिली असून, हा सप आघाडी सुमारे १५० जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे संकेत या चाचण्यांतून मिळाले आहेत

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….