एटीएम मशीन फोडून रोकड केली लंपास ; महागाव तालुक्यातील घटना ; चोरटे शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोंपिलवार :९४२३६५२४६३
हिवरा सं. – महागाव :
मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम मशीन गॅस कटर च्या साहाय्याने फोडून त्यामध्ये असलेली रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी ९ च्या सुमारास हीवरा संगम येथे उघडकीस आली आहे.

महागाव तालुक्यातील हीवरा येथे माहूर रोडवर असलेल्या हिताची कंपनीचे एटीएम मशीन आहे.मध्यरात्री या एटीएम मशीन ला गॅस कटर च्या साहाय्याने फोडून त्यामध्ये अंदाजित ४ लाख रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.तत्पूर्वी चोरट्यांनी एटीएम मशीन कक्षात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षतेसाठी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. हे विशेष. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला आहे.
महागाव तालुक्यातील वाढती गुन्हेगारी आणि चोरीचे प्रमाण पाहता कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….