लालूंच्या दोन्ही किडण्या फेल ; प्रकृतीत अजिबात सुधारणा नाही…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पाटणा :- चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांची किडनी 80 टक्क्यांहून अधिक निकामी झाली आहे.
त्यांच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ताज्या अहवालानंतर औषधाचा डोस किंवा औषध बदलण्याचा विचार केला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली आहे
चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांची किडनी 80 टक्क्यांहून अधिक निकामी झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत अजिबात सुधारणा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, ताज्या अहवालानंतर औषधाचा डोस किंवा औषध बदलण्याचा विचार केला जात आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली आहे.
परिस्थिती अशीच राहिल्यास त्यांना डायलिसिस करावे लागण्याचीही शक्यता आहे. लालू सध्या प्रकृतीच्या कारणास्तव रिम्स रुग्णालयाच्या पेइंग वॉर्डमध्ये दाखल आहेत. मंगळवारी, रिम्समध्ये लालूंच्या सीरम क्रेटेनाइन लेवलची तपासणी करण्यात आली. जी पूर्वी 3.5 वरून 4.1 पर्यंत वाढली होती.
लालू हे किडनीसह अनेक आजारांचे रुग्ण आहेत. त्यांच्या दातांचे नुकतेच रूट कॅनल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बऱ्याच दिवसांपासून खराब आहे. चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण असलेल्या दोरांडा ट्रेझरी प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणावरून जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याची सुनावणी 11 मार्च रोजी होणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….