पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात :- राणेंचा खळबळजनक दावा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : पवार साहेबचं दाऊदचा माणूस असू शकतात असं ट्विट करत नारायण राणेंचे सुपुत्र भाजप नेते निलेश राणेंनी (Nilesh Rane) थेट शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यापासून भाजपने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणी लावून धरली आहे अशातच आज मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दबाव वाढवण्यास सुरुवात केली असून राजीनामा घेण्यासाठी आज आझाद मैदानात मोर्चाचं आयोजन देखील भाजपकडून करण्यात आलं आहे.
फडणवीसांकडून वारंवार मलिक हे दाऊद गँगशी जोडलेले आहेत असल्याचा आरोप करतायत आपल्या भाषणातून ते सतत मलिकांवर हल्लाबोल करत आहेत. तर भाजपवाले प्रत्येक मुस्लीम व्यक्तीचे नावं दाऊदशी जोडतात असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं. मात्र आता नारायण राणेंचे सुपुत्र भाजप नेते निलेश राणेंनी थेट शरद पवारांवर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला आहे याबाबत त्यांनी ट्विट करत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.