चिमुकल्यांनी साकारले कर्तबगार महिलांचा भूमिका; कोणी बनल्या जिजाऊ तर कोणी कल्पना चावला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- दरवर्षीप्रमाणे यंदाही 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे.जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या समाजातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि आर्थिक, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवणे आणि त्यांना अधिकारांची जाणीव करून देणे.
ह्यासाठी आज महागाव तालुक्यातील प्रियदर्शनी सिबीएससी शैक्षणिक संस्थान येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
तसेच हुतात्म कर्तबगार महिलांचा भूमिका लहान चिमुकळ्यांनी आपल्या वेशभूषेतून दर्शविल्या.. कोणी जिजाऊ तर कोणी झाशी ची राणी तर कोणी मदर टेरेसा तर कोणी सावित्री बाई फुले बनून त्यांचे उच्च विचार ह्या ठिकाणी मांडत होते.
ह्या सत्कार समारंभाला विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.
केतकी विशाल पांडे,वनिता सुभाष हागवणे,नम्रता अमोल राजूरकर,स्नेहल अमिळकंठवार,स्नेहा संदीप ठाकरे इत्यादी महिलांचे तुळशीचे झाड देऊन सत्कार करण्यात आले.
सर्व सत्कार मूर्ती आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता’ आहे.
आजही अनेक देशांमध्ये स्त्री-पुरुष समानतेत खूप फरक आहे, आजही अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांसारखे अधिकार दिले जात नाहीत. अशा परिस्थितीत लैंगिक समानतेचा संदेश जगभर पोहोचवणे हा जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरी आणि योगदानाची नोंद घेणे आणि सर्व लैंगिक पूर्वग्रह, रूढी आणि लैंगिक भेदभाव यापासून मुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने काम करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
शाळेतील प्रिन्सिपल अभिषेक राठोड ह्यांनी सुद्धा चिमुकल्यांना स्त्री पुरुष समानतेचा धडा दिला.
शाळेतील स्टाफ संतोष वाघ,विजय राठोड,दिगल सर,तेजल खरसाडे, स्वाती पुसंदे, अंकिता तायडे, मोनाली ठाकरे ह्यांचा मेहनतीने हा सत्कार सोहळा थाटात पार पडला.
अद्विका नरवाडे,पूर्वी भेदूरकर,ओजस्वी चौधरी, प्राची चौहान,श्रेया राठोड, पूर्वी चौहान,संस्कृती, प्रतीक्षा, तन्वी आडे,भाव्या,पूनम राऊत,पूनम गंगासागर, भार्गवी ह्या सर्व चिमूकळ्यांनी कर्तबगार महिलांचा विविध भूमिका साकारल्या..