गॅस सिलेंडरचा स्फोट : मायलेकिंचा मृत्यु : आर्णि तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ (आर्णी) :
यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयहेलाउन टाकणारी घटना आज सकाळी साडे आठच्या सुमारास घडली आहे . या मनसुन्न करणाऱ्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे . स्वयंपाक वेळी गॅस पेटवताना हा स्फोट झाला असल्याचे प्राथमिक माहिती आहे . प्राप्त माहितीनुसार, काजल विनोद जैस्वाल (वय 30) व वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय 5) अशी मृतकांची नावे आहेत. या स्फोटामुळे घराला आग लागून संपूर्ण घर जळून नुकसान झाले.कुटुंबातील व्यक्ती घरून पेट्रोल, डिझेलची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आगीने रुद्रावतार धारण केले. आग नियंत्रणात आणण्यासाठी गावकऱ्यांनी धाव घेतली.मिळेल त्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले परंतु आगीत घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी सापडली.
स्वयंपाक वेळीगॅस पेटविताना घडली दुर्घटना :
पत्नी काजल गॅस पेटवण्यासाठी गेल्या. तेव्हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्या भाजल्या गेल्या. त्यांच्या बाजूलाच अससेली मुलगी वैभवलक्ष्मी होरपळली. यात दोघी मयालेकिंचा शेवट झाला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….