आदिवासी विभागाच्या योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 04 मार्च, :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या कार्यालयामार्फत उत्पन्न वाढीच्या योजना, प्रशिक्षणाच्या योजना तसेच कल्याणात्मक योजनांसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत 11 मार्च पर्यंत वाढवून देण्यात आली आहे.
या योजनांमध्ये तुषार सिंचन, शेळीगट, स्प्रे पंप, बी-बीयाणे व खते यासाठी अर्थसहाय्य करणे, आदिवासी युवक युवतींना पी.एम.टी., पी.इ.टी., जे.ई.ई., एन.ई.ई.टी., एम.एस.सि.आय.टी., मराठी व इंग्रजी टंकलेखन, लिपीक, पोलीस भरती, तलाठी परिक्षेचे पुर्व प्रशिक्षण देणे तसेच वाहन चालकाचे प्रशिक्षण देवून परवाना काढून देणे, लॅपटॉपसाठी अर्थसहाय्य करणे व आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड काढून देणे इत्यादी योजनांचा समावेश आहे.
उपरोक्त योजनांचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 07235-227436 या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..