गेल्या 24 तासात दोन पॉझिटिव्ह ; सहा कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 14
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 04 मार्च, :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर सहा जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 13 व बाहेर जिल्ह्यात 1 अशी एकूण 14 झाली आहे. त्यातील सर्व 14 रूग्ण गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 549 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 547 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 79061 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 77244 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1803 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या दोन रूग्णात एक महिला व एक पुरूष असून त्यात नेर तालुक्यातील एक व इतर जिल्ह्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 45 हजार 685 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लाख 66 हजार 624 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.35 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.36 आहे तर मृत्यूदर 2.28 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1766 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी सर्वच बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेड, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेड आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेड शिल्लक आहेत.
नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..