अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मांडल्या ६२५० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्य सरकारच्या वतीने सुमारे ६२५० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत मांडण्यात आल्या.
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या गोंधळातच या पुरवणी मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या.
राज्य सरकारच्या वतीने सतेज पाटील यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी विरोधकांच्या गोंधळातही या मागण्या पटलावर ठेवण्यासाठी सांगत कामकाज रेटून नेले.
पुरवणी मागण्यांवर येत्या दोन दिवसात चर्चा होणार आहे. विधान परिषद आणि विधान सभा या दोन्ही ठिकाणी आज झालेला गोंधळ पाहता दोन दिवसाच्या चर्चेत नेमके कामकाज कसे चालणार हे पाहणे गरजेचे आहे. या मागण्यांसाठी आजच्या दिवशीही पटलावर मांडताना सरकारने रेटून नेण्याची भूमिका मांडली. त्यामुळे चर्चेत काय काय होणार हेदेखील येत्या दिवसात स्पष्ट होईल.
आज राज्यपालांच्या अभिभाषणात झालेल्या गोंधळामुळे राज्यपाल भाषण अर्ध्यातच सोडून निघून गेले. सत्ताधारी पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर सभागृहात विरोधकांकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे राज्यपालांनी भाषणाच्या सभागृहातून काढता पाय घेतला.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..