माहूरगड येथील श्रीरेणूकामाता मंदिराच्या पायथ्याशी भिषण आग ; नगर पंचायतीचे अग्निशमन पथक वेळेत पोचल्याने पुढील अनर्थ टळला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
माहूर :- साडेतीन शक्तीपीठापैकी मूळपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर गडाच्या पायथ्याशी गेल्या अनेक वर्षांपासून पातळखण, ओटी, विडा प्रसाद विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची ११० दुकाने असून मंदीराच्या चारही बाजूंनी घनदाट जंगल असल्याने उन्हाळ्यात पानझड होउन उन्हाने सुकलेल्या पानामूळे दरवर्षी वनवा लागल्याने आग लागून वनसंपत्तीसह वन्य प्राण्यांंचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते,दिनांक १मार्च २०२२ रोजी रात्री ८ वाजताचे दरम्यान वनवा लागल्याने मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दुकानाच्या मागील बाजूस आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून नगरपंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांना दिली.त्या नंतर काही वेळात अग्निशमन वाहनांसह पथक घटनास्थळी दाखल झाले नगर पंचायतीच्या पथकासह कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन वाहनाचे चालक अविनाश रुणवाल, स्वच्छतादूत गणेश जाधव, विजय शिंदे, जोतिबा खडसे, प्रविण शेंडे, यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, न.पं.काँग्रेस गटनेते विलास भंडारे, राजू सौंदलकर, रेणुकादेवी व्यापारी असोसिएशनचे सचिव संजय आराध्ये,रणधीर पाटील, तानूभाई, शेख नबी साहब यांनी घटनास्थळी भेट दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….