शेतकऱ्यांना जैविक खताचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे :- जिल्हाधिकारी यांच्या खत विक्रेत्यांकना सूचना….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 02 मार्च, :- शेतकऱ्यांना जैविक खताची माहिती देवून त्याचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे, जेणेकरून रासायनिक खतांचा वापर देखील कमी होऊन शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांना वळता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज खत विक्रेत्यांना दिल्या.
खरिप हंगाम 2022 करिता रासायनिक खताचे नियोजन करण्यासाठी कृषी अधिकारी, खत उत्पादक कंपनीचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी व किरकोळ विक्रेते यांची बैठक आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळवे, कृषी अधिकारी शिवा जाधव तसेच आरसीएफ, कृभको, इफको, नागार्जून इत्यादी विविध खत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी बोलतांना पुढे म्हणाले की इ-पॉस मशीनला उपलब्ध खताचा साठा लवकर संपवून नवीन खतसाठ्याची मागणी नोंदवण्याचे तसेच पॉस मशील मधील खत साठा व प्रत्यक्ष साठा यांचा ताळमेळ जुळविण्यासाठी तपासणी मोहिम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. मागील वर्षी ज्याप्रमाणे खताची टंचाई भासली नाही, त्याचप्रमाणे यावर्षी देखील खताची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून तसेच कृत्रीम टंचाई देखील निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. खत विक्रेत्यांनी खताची विक्री एम.आर.पी. पेक्षा कमी दरातच करावी. चुकीच्या खताचा पुरवठा होणार नाही याबाबत दक्षता घेवून केवळ प्रमाणीत केलेली खतेच विक्री केली जावी. नियमानुसारच खत विक्री करावी व बंदी असलेली निविष्ठा विक्री होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाद्वारे खत विक्रीवर लक्ष ठेवण्यात येत असून खत विक्री संबंधात चुकीच्या बाबी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सुरवातील जिल्हाधिकारी यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) नियामक मंडळाची तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची आढावा सभा घेतली. पिक प्रात्याक्षीक घेणे, रेशीम उद्योग प्रशिक्षण देणे, रेशीम शेतीसाठी नर्सरी तयार करणे, कृषी केंद्रावर जैविक खताचे प्रमाण वाढविणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नेमूण दिलेल्या क्षेत्रात नाविण्यपुर्ण पीकाची निवड करणे, शेतकरी गट स्थापन करून कंपनीची नोंदणी करणे तसेच कामात केलेल्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्यात सादर करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, रेशीम विकास अधिकारी पी.एम. चौगुले, नाबार्डचे श्री पेंदाम, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. सविता राऊत, दिग्रस कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. एन.अे. हीरवे, विस्तार शिक्षणचे विषय तज्ञ मयुर ढोले, महाबीजचे अशोक ठाकरे, जे.डी.राऊत, आर.एल.तायडे, रंजीत बोबडे, ए.बी.पाटील, काशिनाथ मिलमिले, अशोक वानखेडे, रामभाऊ माशेटवार, लक्ष्मीबाई पारवेकर, जगदीश चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….