खासदार राणा व पोलीस विवाद प्रकरण ; अमरावती , मुंबई पोलीस आयुक्ताना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे वीज देयक माफ व्यावे या मागणीसाठी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जाणार होते.
मात्र, अमरावती पोलीस आयुक्त यांनी रवी राणा व नवनीत राणा यांना मुंबई जाण्यापासून रोखले तसेच पोलिसांच्या गाडीत पोलीस आयुक्तालयात आणून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेच्या प्रिविलेज कमिटीकडे ( privilege committee of parliament in india ) दाखल केली
अमरावती – दोन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत खासदार नवनीत राणा ( Mp Navneet Rana ) व आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) हे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे वीज देयक माफ व्यावे या मागणीसाठी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जाणार होते. मात्र, अमरावती पोलीस आयुक्त यांनी रवी राणा व नवनीत राणा यांना मुंबई जाण्यापासून रोखले तसेच पोलिसांच्या गाडीत पोलीस आयुक्तालयात आणून अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेच्या प्रिविलेज कमिटीकडे ( privilege committee of parliament in india ) दाखल केली. खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, तत्कालीन पोलीस आयुक्त उपायुक्त शशिकांत सातव आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना लोकसभा सचिवालयात 9 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खासदार नवनीत राणा याबाबत बोलताना
असे आहे प्रकरण –
2020मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांचे वीज देयक माफ करावे यासाठी आमदार रवी राणा यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा मतदार संघ असणाऱ्या तिवसा येथे आंदोलन केले होते. याप्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी आमदार राणा हे कारागृहात होते. महालक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात कोरोना काळात कारागृह असणाऱ्या अंध विद्यालयासमोर युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या देऊन आंदोलन केले होते.
आमदार राणा भाऊबीजेच्या दिवशी कारागृहाबाहेर आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन थेट मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवल्यावर सायंकाळी पोलिसांच्या मोठ्या वाहनात बसवून पोलीस आयुक्तालयात आणले होते. यावेळी पोलीस आयुक्तलयाबाहेर राणा दाम्पत्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या देऊन आंदोलन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या दबावात येऊन अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी आपल्याला अटक केली आणि आम्ही मुंबईला पोहोचू नये यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनीही अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना काही झाले तरी राणा दाम्पत्याला मुंबईत येऊ देऊ नका, असे आदेश दिले असल्याचा आरोप त्यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला होता.
खासदार राणा यांनी दिला होता कारवाईचा इशारा –
एका आमदार आणि खासदाराला आपली बाजू मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्यासाठी रोळणाऱ्या अमरावती आणि मुंबईच्या पोलीस आयुक्त आणि उपयुक्तांवर कारवाई करण्याचा इशारा मी दोन वर्षांपूर्वीच दिला होता. आता लोकसभेच्या प्रिविलेज कमिटीने दोन्ही पोलीस आयुक्त आणि आमचा छळ करणारे अमरावतीचे तत्कालीन पोलीस आयुक्त शशिकांत सातव तसेच मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस बजावली आहे. 9 मार्चला या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आमच्यावर केलेल्या अन्यायाबाबत जाब द्यावा लागेल आणि कारवाईला समोर जावे लागणार, असे खासदार नावनीत राणा यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….