राज्यावर भारनियमनाचे संकट ; दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचे ढग घोंगावू लागले आहेत. एकीकडे राज्यात उन्हाचा पारा वाढत असताना विजेच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कोळसा उपलब्ध होत असल्याने पुन्हा एकदा राज्यात भारनियमन सुरु होण्याची शक्यता ऊर्जामंत्र्यानी व्यक्त केली आहे.
आपल्या घरातील विजेचा वापर जपून करावा लागणार आहे. कारण पुन्हा राज्यात विजेचे भारनियमन सुरू होणार आहे आणि याला कोळसा कारण ठरला आहे. याच कोळशातून वीज प्रकल्पात वीज तयार होते. मात्र आता केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोळसा राज्यातल्या वीज प्रकल्पात शिल्लक आहे..
राज्यातील कोणत्या वीज प्रकल्पात किती कोळशाचा साठा….?
कोराडी वीज प्रकल्प – तीन दिवस पुरेल इतकंच कोळसा
नाशिक वीज प्रकल्प – दोन दिवस पुरेल इतकंच कोळसा
भुसावळ वीज प्रकल्प – एक दिवस पुरेल इतकंच कोळसा
परळी वीज प्रकल्प – दीड दिवस पुरेल इतकंच कोळसा
पारस वीज प्रकल्प – साडेचार दिवस दिवस पुरेल इतकंच कोळसा..
चंद्रपूर वीज प्रकल्प – सहा दिवस पुरेल इतकंच कोळसा
खापरखेडा वीज प्रकल्प – 12 दिवस पुरेल इतकंच कोळसा
राज्यात सध्या 6 लाख 75 हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे.
राज्यातील या वीज प्रकल्पांना रोज एक लाख ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो. मात्र जशी विजेची मागणी वाढते तसा कोळशाचा वापर देखील वाढतो. त्यामुळेच तर पुढच्या एक-दोन दिवसात कोळसा उपलब्ध नाही झाला तर भारनियमनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
कोळशाची कमतरता ही केवळ राज्यातच नाही तर देशभरात कमी-जास्त प्रमाणात भासत आहे. देशातील सत्तर टक्के वीज प्रकल्प हे कोळशावर अवलंबून आहेत. कोळशाचा पुरवठाला नैसर्गिक कारण अपेक्षा ही मानवी हस्तक्षेप अधिक जबाबदार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर कोळसा वेळेवर उपलब्ध नाही झाला तर पुन्हा राज्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….